गुंतवणुकीचा गेल्या 10 वर्षांमधील उच्चांक उद्योग ऑक्टोबरमध्ये 28.2 लाख कोटींवर
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
मागील एक दशकामध्ये देशातील म्युच्युअल फंड उद्योगाने विकासावर भर दिल्याचे पहावयास मिळाले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडच्या एका ताज्या अहवालानुसार या उद्योगाचा एकूण असेट अंडर मॅनेजमेंट(एयूएम) 4.4 पटीने वधारुन ऑक्टोबर 2020 मध्ये 28.2 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये हा आकडा 6.5 लाख कोटींवर राहिल्याची नोंद आहे.
प्राप्त अहवालानुसार पहिल्यांदाच म्युच्युअल फंड्सचा एयूएम 28 लाख कोटी रुपयांची नवीन विक्रमी पातळी पार केली आहे. मागील वर्षात पहिल्यांदाच यांनी 27 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता.
सप्टेंबर 2020 च्या तुलनेत एयूएममध्ये 5.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये नफा कमाई, लिक्विडिटी आणि इक्विटी फंड्स आदींची भूमिका आहे. ही कामगिरी बजावण्यास कारणीभूत ठरली आहे.
इक्विटी एयूएम महिन्यात 1.6 टक्क्यांनी तेजीत
देशातील म्युच्युअल फंड्सचा इक्विटी एयूएम सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 1.6 टक्क्यांनी वधारुन 8.2 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये इएलएसएस आणि निर्देशांक फंड्सचा समावेश राहिला असल्याचे या अहवालात नोंदवले आहे.









