मुंबई : टॅक्सीच्या क्षेत्रात दबदबा असलेल्या ओला कंपनीने आता स्कुटर निर्मितीत रस दाखवला आहे. पर्यावरणाला पुरक ठरणाऱया इ-स्कुटरच्या निर्मितीसाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत.
ओला ही कंपनी येणाऱया काळात आपले लक्ष्य इ स्कुटर निर्मितीवर देणार असल्याचे समजते. इ स्कूटर नि&िर्मतीच्या कार्यात कंपनी स्वत:ला झोकून देणार असून विविध राज्य सरकारांशी याबाबतीत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. इलेक्ट्रीक स्कूटर निर्मितीचा मोठा कारखाना घालण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रासहीत आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांशी चर्चा केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याला चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे समजते. कंपनीला वर्षाला 20 लाख स्कूटर्स तयार करायच्या आहेत. असून त्याकरिता 100 एकर जागा लागणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- 18 ते 24 महिन्यात उत्पादनाला सुरुवात होणार
- निर्मितीत बजाज, हिरो मोटोकॉर्प, हिरो इलेक्ट्रीकचा समावेश
- निर्मितीत सौर ऊर्जेचा वापर









