बरे झाल्याने 146 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात आज, शुक्रवारी 145 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 146 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
आज, 2513 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 145 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2368 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 145 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 94 पुरुष आणि 51 स्त्रियांचा समावेश आहे. यानंतर ग्रामीण भागातील एकूण बाधिताची संख्या 32965 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 279441
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 32965
-प्राप्त तपासणी अहवाल : 279395
-प्रलंबित तपासणी अहवाल : 46
-निगेटिव्ह अहवाल : 246430
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 977
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1888
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 30101
तालुका निहाय पॉझीटिव्ह रुग्ण
अक्कलकोट 1147, बार्शी 6047, करमाळा 2083, माढा 3430, माळशिरस 5791, मंगळवेढा 1470, मोहोळ 1648, उत्तर सोलापूर 743, पंढरपूर 6608, सांगोला 2534, दक्षिण सोलापूर 1465
Previous Articleसोलापूर शहरात 31 जण कोरोनामुक्त, 23 नवे रुग्ण
Next Article पुणे विभागातील 4 लाख 85 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त!









