इतरांच्या तुलनेत कमी व्याजदर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आतापर्यंत वेगळय़ा कार्यासाठी ओळख असणारा गोदरेज समूह आता नवीन व्यवसायात समावेश करत आहे. कंपनीने आता फायनान्शिअल सर्व्हिसेस उद्योगात प्रवेश केला आहे. कंपनीने वित्त क्षेत्रातील नव्या कंपनीचे नाव ‘गोदरेज हाऊसिंग फायनान्स’ असे ठेवले असल्याची माहिती आहे.
गोदरेज फायनान्स कंपनी 6.69 टक्क्यांच्या कमीत कमी व्याजदरासोबत गृहकर्ज ग्राहकांसाठी देणार असल्याची माहिती आहे. हा व्याजदर देशातील सर्वात मोठय़ा बँका, स्टेट बँक, बँक ऑफ इंडियासह अन्य बँकांच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.
गोदरेज फायनान्स हाऊसिंगच्या माहितीनुसार मॉरगेज व्यवसायावर भर देण्यासोबत गृहकर्जासोबत व्यवसायाची सुरुवात करणार असल्याचे गोदरेजने सांगितलेआहे.
निवडक शहरांमध्ये सुरुवात
देशातील मुंबई, एनसीआर, पुणे आणि बेंगळूर आदी ठिकाणी गोदरेज फायनान्सची सुरुवात केली असून येत्या काळात या सेवेचा विस्तार देशातील अन्य शहारांमध्ये करणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी दिली आहे.