प्रतिनिधी/ लांजा
खवले मांजराच्या खवले तस्करी प्रकरणी स्वप्नील भुवड याला अटक करण्यात आली असून आज राजापूर न्याययाल्यासमोर उभे केले असता दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
खवळे मांजर ची खवले विकण्यासाठी तयारीत असलेल्या साटवली येथील जितेंद्र चव्हाण याला रत्नागिरी गुन्हा अन्वेषण पथकाने गुरुवारी रुन येथे साटवली रस्त्यावर जेरबंद केले होते. जितेंद्र हा एका राजकिय पक्षाचा पदाधिकारी आहे. तो तोतया वार्ताहर म्हणून तालुक्यात वावरत होता. गुन्हा अन्वेषण विभागाने हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलीस तपासात जितेंद्र चव्हाण याने सडवली येथील एकाकडून खवले मांजर घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यावरून त्याचा साथीदार याच्यावर ही वन्यप्राणी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी काल स्वप्नील भुवड याला त्याबत घेतले होते..यात आणखी किती जण अडकले आहेत याची माहिती घेण्यात आली आहे. त्या दुस्रया साथीदाराला अटक केल्यानंतर च खरी माहिती उलगडनार आहे. लांजा तालुक्यात कनगवली येथे ही खवले मांजर तस्करी प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्या ने या त मोठी टोळी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. खवले मांजराची खवले आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. शक्तिवर्धक औषधात ही खवले वापरली जातात.मध्यतरी खवले मांजर वाचवा ही मोहीम जिल्हा वन विभागाच्या वतीने राबविण्यात आली होती. त्यासाठी ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली होती. यासाठी हम रस्त्यावर फलक लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मोहीम थँडावली. ते फलक ही अडगळीत गेले आहेत.









