महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
उषेची मैत्रिण चित्रलेखा ही महायोगिनी होती. उषेच्या स्वप्नात आलेला युवक हा कृष्णाचा नातू आणि प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध हाच आहे याची ।
काली द्वादशीचिये रजनीं ।
तुम्ही संचार करूनि स्वप्नीं । अनूढा गूढ कन्यासदनीं । सुखशयनीं अनुभविली ।
तिणें हृदयीं निर्धार केला । स्वप्नीं मजसीं नरवर रमला । त्यावीण न वरिं आणिकाला ।
त्यजीन प्राणांला तद्विरह ।ऐसा जाणोनि दृढ निर्धार । म्यां ठाकिलें द्वारकापुर ।
स्वामींस कथिला समाचार । आतां सत्वर चलावें ।तुम्हांवांचून एकली सदना ।
मज गेलिया टाकील प्राणां । तिचिया लावण्यनवयौवना। साफल्य जाणा तुमचेंनि । ऐसें ऐकोनि रोचनापति।
द्वादशीची स्मरूनि राती । स्वप्नीं अनुभविली जे युवति। पाहे प्रतीतिमाजिवडी ।तथापि म्हणे हे राक्षसी माया । येथ पातली कवण कार्या । कुत्सति मार्गें कामचर्या ।
सहसा आर्या योग्य नोहे।मग म्हणे वो चातुर्यखाणी। बळ प्रद्युम्न चक्रपाणि । वृत्तान्त घालूनि त्यांचे कर्णीं । करूं हे करणी त्याउपरी । अनिरुद्धवचन ऐकूनि ऐसें ।
चित्रलेखा निजमानसें। म्हणे विलंबें कार्य नासे । पुढती नुमसे प्रतिवचन ।मग जपूनि तामसी विद्या। तत्काळ मोहिलें अनिरुद्धा । तेथूनि निघती झाली सद्या । नरवरवंद्या तें ऐक ।
अनिरुद्धाने आपल्या दासदासींना घरी जाण्याची आज्ञा दिली आणि निदेच्या आधीन होण्यासाठी तो मंचकावर पहुडला. इतक्मयात त्याने चित्रलेखेला पाहिले.
महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात-
आपल्या शयनकक्षात आपल्या मंचकाजवळ एक अपरिचित युवती पाहून अनिरुद्धाला आश्चर्य वाटले. त्याने चित्रलेखेला विचारले की तू कोण व इथे कशासाठी आलीस. चित्रलेखेने सर्व वृत्तांत कथन केला व म्हणाली-स्वामी! आपण आता माझ्यासोबत उषेकडे त्वरित चला. आपण उशीर केलात तर उषा आपला प्राण सोडील. तिचा जीव वाचवणे केवळ आपल्या हातात
आहे.
मागील द्वादशीच्या रात्री काय घडले होते याचे स्मरण अनिरुद्धाला तिने करून दिले. अनिरुद्धही उषेला प्रत्यक्ष भेटायला उत्सुक होता. पण ती बाणासुराची कन्या आहे आणि ही काही राक्षसी माया असेल तर? असा विचार करून तो म्हणाला-मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. पण तत्पूर्वी मला बलरामदादा, भगवान श्रीकृष्ण व माझे बाबा प्रद्युम्न यांच्या कानावर ही गोष्ट घालून त्यांची अनुज्ञा घ्यावी लागेल.
या सर्व गोष्टींना बराच विलंब लागेल हे चित्रलेखेच्या लगेच लक्षात आले. तिने क्षणाचाही विलंब न करता आपल्या योगिक सामर्थ्याने तामसी विद्येचा वापर करून अनिरुद्धाला मोहित केले.
Ad. देवदत्त परुळेकर








