जिल्हाभर जनपंचायत शिवार संवाद दौरा सुरू , शेतक-यांच्या आशा पल्लवीत
व्हनाळी / सागर लोहार
राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा देखील झाली परंतु या कर्जमाफीमध्ये प्रामाणिक कर्जफेड करणारा शेतकरी उपाशी तर कर्जबुडवे शेतकरी तुपाशी अशीच अवस्था सध्या तरी दिसत आहे. परंतु या सर्वांमध्ये सर्वच शेतक-यांना सरसकट पन्नास हजार प्रोत्सहनपर अनुदान मिळालेच पाहिजे ही भुमिका घेवून भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे हे पायाला भिंगरी बांधून जिल्हाभर शेतक-यांत जनजजागृती करत आहेत. प्रोत्सहनपर अनुदान प्रसंगी रस्त्यावरही येवून आंदोलन छेडण्याची त्यांची तयारी आहे. असे शेतकरी हिताची भुमिका घेणारे ते जिल्हातील एकमेव ठरले आहेत.
आपल्या या उपक्रमाला घाटगे यांनी राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रम असे नाव दिले आहे. त्यांच्या माध्यमातून समरजीतसिंह घाटगे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवारातील बांधावर जावून गाव आणि त्या परिसरातील शेतक-यांशी संवाद साधतात. छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसा सांगताना एकेकाळी शेतक-यांना आवजारे मिळावीत म्हणून शाहू राजांनी आपल्याकडील तोफा दिल्याची आठवणही ते करून देतात. आपल्याला कुनाचा वेट करण्यासाठी नाही तर शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी या संवादामध्ये इंट्रेस्ट असल्याचे ते सांगतात. कोणाचेही नाव न घेता कांही नेत्यांना दुस-या जिल्ह्यात जावून तेथील शेतक-यांचे नुकसान पहायला वेळ आहे मात्र आपल्याच तालुक्यातील शेतक-यांने नुकसान पहायला वेळ नसल्याची खंतही ते आपल्या दैा-याच्या माध्यमातून व्यक्त करताता.
भाजपाच्या काळात झालेली कर्जमाफी आणी आताच्या सरकारची कर्जमाफी यातील तुलना ते अकडेवारीसह शेतक-यांना पटवून देतात. महापुर,कोरोना,अतीवृष्टी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेल्या सर्वच शेतक-यांना सरसकट पन्नास हजार रूपये प्रोत्सहनपर अनुदान मिळालेच पाहिजे.तसेच लॅकडावून काळातील वाढून आलेली वीजबिले माफ करावीत आणि केलेली वीजदरवाढ माघे घ्यावी. यासाठी सर्व शेतक-यांनी आपल्याला साथ देण्याचे ते आवाहन करतात. आणि पुढच्या थांबलेल्या शेतक-यांच्या भेटीसाठी कधीकधी बैलगाडीतूनही शेतीशिवारात फेरफटका मारत मार्गस्थ होतात. यावेळी जनपंचायत शिवार संवाद दैा-यात त्यांच्या समवेत किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, तसेच स्थानिककचे गटनेते,कार्यकर्ते शेतकरी उपस्थीत असतात. कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वतः शेतक-यांच्या वैयक्तीकसमस्या आणि अडचणी देखील जाता-जाता जाणून घेत निवेदनही स्विकारतात.
कार्यक्रमात खर्चालाही फाटा….
समरजितसिंह घाटगे यांच्या दौऱ्यातील एकुण कार्यक्रमामध्ये मास्कचा वापर अनिवार्य असतोच परंतु त्याच बरोबर हार,तुरे,फटाके,बुके याचा देखील वापर होताना फारसा दिसत नाही.समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार देखील ऊसाची मोळी देवूनच शेतकरी करतात त्यामुळे जनपंचायत शिवार संवाद दौ-यात खर्चालाही फाटा देण्याचा प्रत्यन त्यांनी केली आहे.
कुणाचे डोळे पांढरे…..
समरजितसिंह घाटगे यांच्या दौ-यात सरकारवर सडकुन टिका होते. महाआघाडीच्या सरकारने कर्जमाफी देताना आशी कर्जमाफी देवू की विरोधकांचे डोळे पांढरे होतील असे वक्तव्य केले होते. परंतु या झालेल्या कर्जमाफीमध्ये शेतक-यांचेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली असल्याची टिका होते.
Previous Articleचुरशीच्या संग्रामात रालोआला आघाडी
Next Article कोल्हापुरात दुधाचे एटीएम मशीन…









