प्रतिनिधी/ बेळगाव
विनायकमार्ग समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळ संचालित दुर्गाशक्ती महिला मंडळाच्यावतीने मंगळवारी शिवप्रताप दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून विघातक शक्तींचा नाश केला होता. त्याची आठवण म्हणून प्रतिवषी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. लाडू व मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे उमेश ताशिलदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परशराम बेकवाडकर, संतोष कणेरी, नागेश गावडे, किशोर कुंडेकर, अशोक खवरे, सुशील कणेरी, महेश पालकर, संजय पाटील, अरुण गावडे, गिरीष कणेरी, रमेश चौगुले, सुहास गावडे, रतन चौगुले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.









