बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकीच्या जागांची मतमोजणी सुरु झाली आहे. राजराजेश्वरी नगर आणि सिरा या ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. राजराजेश्वरी नगर (आरआर नगर) विधानसभेच्या मतमोजणीच्या १० व्या फेरीत भाजपाचे उमेदवार मुनिरत्न ५५,१०३ मते घेऊन आघाडीवर आहेत तर कॉंग्रेसच्या उमेदवार कुसुमा एच यांनी २७,९२३ मते मिळविली आहेत. जेडी (एस) च्या कृष्णमूर्ती यांना आत्तापर्यंत २,२५६ मते मिळाली आहेत.
दरम्यान सिरा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत सातव्या फेरीत भाजपाचे उमेदवार राजेश गौडा २१,४०१ मते घेऊन आघाडीवर आहेत तर कॉंग्रेसचे उमेदवार जयचंद्र यांनी १८,०७६ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जेडी (एस) उमेदवार आतापर्यंत ११,६४८ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बेंगळूरमधील राजराजेश्वरी नगर (आरआर नगर) आणितुमकूरमधील सिरा या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी सकाळी सुरुवात झाली.









