रहदारी आयुक्त एम.शोभा यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह देशात वायु प्रदुषणाचा मोठो धोका निर्माण हाते आहे. कोरोना काळात काही प्रमाणात सर्वांना शुध्द ऑक्सीजन मिळाले होते. मात्र यापुढे पुन्हा वाहतूक सुरू झाल्याने प्रदुषणात भर पडली आहे. त्यामुळे वायु प्रदुषणासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे प्रतिपादन परिवहन आयुक्त एम. शोभा यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन आणि प्रादेशिय परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वायु प्रदुषण मास नोव्हेंबर 2020 करण्यात आला. यानिमित्त त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. क्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बिम्स्चे वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप्प, दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वेंकटेशराव, आरटीओ शिवानंद मगदूम उपस्थित होते.
यावेळी एम. शोभा यांनी वायु प्रदुषणामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. पृथ्वी आणि आपली भावी पिढी वाचवायची असेल तर वायु प्रदुषणासाठी सर्वांनी यासाठी लढा देण्याची गरज आहे. यापुढे आपल्याला ऑक्सीजनच्या गॅस वापरावे लातील, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी साऱयांनीच प्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी विनय दास्तीकोप्प व न्यायाधीश वेंकटेशराव यांचीही भाषणे झाली.
प्रारंभी मंगला हुग्गी यांच्या प्रार्थनेने सुरूवात झाली. स्वागत संजय कुलकर्णी यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक शिवानंद मगदूम यांनी केले. आरटीओ कार्यालयातील अधिकारी एस. के. हुग्गी यांनी आभार मानले. यावेळी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.