प्रतिनिधी/ बेळगाव
डेनेज चेंबरमध्ये उतरून स्वच्छता करणाऱया व डोक्मयावरून मैला वाहतूक करणाऱया कामगारांचा शोध घेण्याची मोहीम मनपाने सुरू केली होती. पण मनपाच्या या शोध मोहिमेला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे 2005-06 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलेल्या 383 अर्जदारांना नोटीस बजावून माहिती नोंदविण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
जीव धोक्मयात घालून डेनेज चेंबरची स्वच्छता कामगार करतात. डोक्मयावरून मैला वाहतूक करण्याची पद्धत यापूर्वी होती. पण स्वच्छता कायद्यानुसार अशा प्रकारचे काम करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे. यंत्रोपकरणांचा किंवा सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून स्वच्छता कामे करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्याची जनजागृती मनपाच्या स्वच्छता विभागाकडून करण्यात येत आहे. जीव धोक्मयात घालून डेनेज चेंबरची स्वच्छता करणाऱया आणि डोक्मयावरून मैला वाहतूक करणाऱया कामगारांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद कायद्यात आहे. यामुळे अशा कामगारांचा शोध घेण्यासाठी नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती.
शहरातील दोन ठिकाणी नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली होती. पण मोहिमेवेळी एकाही कर्मचाऱयाची नोंद झाली नाही. त्यामुळे यापूर्वी सर्वेक्षणावेळी मॅन्यअल स्वच्छता करणाऱयाची नोंदणी करण्यात आली होती. 2005-06 मध्ये मॅन्युअल काम करणाऱया 383 कामगारांचा शोध घेण्यात आला होता. पण त्या कामगारांपैकी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नोंदणी केली नाही. मॅन्युअली स्वच्छता काम करणाऱया कामगारांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. त्याकरिता सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने 2005-05 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे 383 अर्जदारांना नोटीस बजावून मॅन्युअली स्वच्छता काम करणाऱयांचा शोध घेण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. दि. 18 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 या वेळेत विविध कागदपत्रांसह मनपाच्या स्वच्छता निरीक्षक बीट कार्यालयात नोंदणी करण्याचे नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे.