रविवार 15 ला कोल्हापूर बाजार समितीत शुभारंभ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शेती उत्पन्ना बाजार समितीतील कोरोनामुळे बंद पडलेला जनावर बाजार दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. रविवार 15 रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे बाजार समितीतील सर्व व्यवहार ठप्प होते. भाजीपाला, फळ यासह जनावरांचा बाजारही बंद ठेवण्यात आला होता. गेली सात महिन्यापासून जनावर बाजारातील उलाढाल बंद आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत आहे.
टप्प्याटप्प्याने सर्व व्यव्हार पूर्व पदावर येत आहे. दोन महिन्यापासून भाजीपाला, कांदा बटाटा, फळ मार्केट सुरु करण्यात आले. त्यामुळे जनावारांचा बाजाही सुरु करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी मदत व पनर्वसनचे मुख्य सचिव यांच्याकडे केली होती, नुकतीच बाजार सुरु करण्यास परवानगी मिळाल्याचे सचिव मोहन सालपे यांनी दिली.
दक्षता घेवून बाजार सुरु
शासनाने घालून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन बाजार सुरु करण्यात येणार आहे. सोशल डिस्टंट, सॅनिटायझर, मास्कची सक्ती आदी कडक नियम करुनच बाजार सुरु होत आहे. – मोहन सालपे, सचिव – बाजारसमिती कोल्हापूर