ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीला पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी बीसीसीआयने विशेष रजा मंजूर केली आहे.
विराटची पत्नी अनुष्का लवकरच आई होणार आहे. पत्नीच्या पहिल्या बाळंतपणासाठी पत्नीसोबत राहता यावे, यासाठी विराटने बीसीसीआयकडे काही दिवस रजा मागितली होती. बीसीसीआयनेही विराटची मागणी मान्य करत त्याला रजा मंजूर केली.
दरम्यान, भारतीय संघ 3 वन-डे, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. पहिला वन-डे सामना 27 नोव्हेंबरला आणि दुसरा वन डे सामना 29 नोव्हेंबरला सिडनी येथे होणार आहे. तिसरा वन-डे सामना 1 डिसेंबरला मनुका ओव्हल येथे होईल.
तर पहिला टी-20 सामना 4 डिसेंबरला मनुका ओव्हल येथे, दुसरा सामना 6 डिसेंबर तर तिसरा सामना 8 डिसेंबरला सिडनीत होणार आहे. पहिला कसोटी सामना 17 ते 21 डिसेंबररोजी अॅडलेड (दिवस-रात्र) येथे होईल.दुसरा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर रोजी मेलबर्न,तिसरा कसोटी सामना 7 ते 11 जानेवारी 2021 सिडनीत तर चौथा कसोटी सामना 15 ते 19 जानेवारला गॅबा येथे होणार आहे. अॅडलेड कसोटीनंतर विराट भारतात परतणार आहे.









