ऑनलाईन टीम / हैद्राबाद :
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते क्वारंटाइनमध्ये आहेत. चिरंजीवी यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. मी स्वतःला केले आहे.

चिरंजीवी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी आगामी चित्रपट ‘आचार्य’चे चित्रीकरण करणार होतो. त्यापूर्वीच मी माझी कोरोना चाचणी करुन घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे.
पुढे ते म्हणाले, गेल्या चार-पाच दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी देखील कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. तसेच मी वेळोवेळी माझ्या तब्येतीची माहिती देत राहीन.









