‘बाय बाय कोरोना’ पुस्तकातून जागरूकता
प्रतिनिधी/ मडगाव
‘सायंटूनन्स’ हा विज्ञान व्यंगचित्रांचा एक नवीन वर्ग आहे, जो आपल्याला केवळ हसवतोच असे नाही तर माहिती देखील प्रदान करतो. नवीन संशोधन, विषय आणि संकल्पना साध्या, समजण्यायोग्य आणि मनोरंजक मार्गाने पुरवित असतो. ‘बाय बाय कोरोना’ नावाचे जगातील पहिले सायंटून पुस्तक, ‘सायटूनिस्ट’ डॉ. प्रदीप श्रीवास्तव यांनी लिहिले आहे. त्यात गोव्याच्या मडगाव येथील श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाच्या तरूणवर्गाने आपले योगदान दिले आहे.
डॉ. प्रदीप श्रीवास्तव हे सीएसआयआर-मध्यवर्ती औषध संशोधन संस्था, लखनऊचे माजी ज्ये÷ प्रधान वैज्ञानिक आहेत. 29 ऑक्टोबर 2020 रोजी लखनौच्या राजभवनात आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन विज्ञान प्रसार या स्वायत्त एजन्सीने केले आहे.
डॉ. नकुल पराशर विज्ञान प्रसार संचालक आणि निमिश कपूर, वैज्ञानिक आणि प्रकाशन विभाग प्रमुख यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. आकर्षक पद्धतीने कोरोनाबद्दलची माहिती या पुस्तकाने उपलब्ध करण्यात आली असून तिची थ्रीडी आवृत्ती बनवण्याची योजना आखली आहे. या पुस्तकाचे संपूर्ण भारत आणि परदेशात बहुभाषिक रूपांतर करण्यात येणार आहे. हे पुस्तक लवकरच ब्राझीलमध्ये प्रकाशित होईल. इंडिया नेटवर्क प्रोग्राम आणि पोर्तुगीज भाषेत अनुवादित केले जावे असे मत डॉ पी. के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले आहे.
मडगावच्या श्रीमती पार्वतीबाई चौगुले कला व विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाने सायंटूनवर दोन राष्ट्रीय कार्यशाळा 2019 आणि 20020 मध्ये आयोजित केल्या होत्या. या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने केले होते. महाविद्यालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. आर. कांचना या कार्यशाळेच्या संयोजक होत्या. तर कु. माधवी मोटणकर (सहाय्यक प्राध्यापक) या सहसंयोजक आणि आयोजन सचिव होत्या.
गोवा सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाने या कार्यशाळा पुरस्कृत केल्या होत्या. डॉ. प्रदीप के. श्रीवास्तव (फादर ऑफ सायंटूनस्) हे स्त्रोत व्यक्ती म्हणून या कार्याळांसाठी उपस्थितीत होते. या कार्यशाळांद्वारे चौगुले महाविद्यालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना सायंटून तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. लॉकडाउन कालावधीत कोविड-19 (साथीचा रोग) सर्व देशभर जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्जनशील वैज्ञानिकांच्या माध्यमातून डॉ. पी. के. श्रीवास्तव यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याची संकल्पना विकसित केली.
सामान्य माणसांमध्ये ‘सार्स-कोव्ह-2’ संसर्ग किंवा कोरोना या जागरूक कशी करता येईल हे या पुस्तकाच्या माध्यमांतून दर्शविण्यात आले आहे. पुस्तकात रंगीबेरंगी, मनोरंजक आणि लक्षवेधी सायंटून्सचा उपयोग करण्यात आलेला आहे. कोरोनावर आजपर्यंत औषधोपचार करण्यासाठी कोणतीही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लोकांना जागरूक करणे हाच एकमेव मार्ग आहे. कोरोनापासून बचाव करणे, रोगापासून जागरूकता आणि स्वतःची काळजी ही रोकथाम करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. हे पुस्तकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
चौगुले महाविद्यालयाने संपूर्ण प्रकाशन कार्यसंघाचे मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त केले आहेत. या पुस्तकासाठी योगदान दिलेल्याचे कौतुक करुन अभिमान वाटत असल्याचे बायोटेक्नॉलॉजी विभागाने म्हटले आहे. या पुस्तकासाठी महाविद्यालाचे विद्यार्थी आणि वैज्ञानिक लकीशा इनासिया कुयेल्हो ई कोस्टा, प्रियांका शंके, श्रीसिद्धी विनोद भोमकर, मारिया शिमरन दा कोस्टा ब्लॉसम, प्रथमेश पुंडलिक शेटगावकर, सम्रादनी रोहित पायगणकर, सेल्स सेव्हिया डा कोस्टा याचे बहुमोल असे योगदान लाभले आहेत.









