मुंबई
कोरोना संकटात अडकलेल्या अनेक भारतीय कर्मचाऱयांना पुढच्या वर्षी गुड न्यूज मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. 2021 मध्ये भारतातील 85 टक्के कंपन्या कर्मचाऱयांना वेतनात वाढ मिळवून देणार असल्याचे समजते. कर्मचाऱयांच्या वेतनात सरासरी 7.3 टक्के इतकी वाढ दिली जाणार आहे, असे एओएन फर्मच्या सर्व्हेक्षणातून दिसून आले आहे. कोरोनाच्या कारणास्तव यावर्षी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा अवलंब केला होता. पुढील वर्षी अधिकतर कंपन्या वेतनात वाढ करणार आहेत.









