नवी दिल्ली
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या भीषण धार्मिक दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपाखाली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालीद याच्या विरोधात अभियोग सादर करण्यास दिल्ली सरकारने अनुमती दिली आहे. सरकारचे अनुमतीपत्र दिल्ली पोलीसांना शुक्रवारी सादर करण्यात आले.
अभियोग चालविण्यास अनुमती दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारनेही दिल्याचे दिल्ली पोलीसांच्या वरीष्ठ अधिकाऱयांनीही स्पष्ट केले. त्यामुळे आता युएपीए कायद्याच्या अनुच्छेद 13 अंतर्गत हा अभियोग आरोपीविरोधात चालविला जाणार आहे. खलीद याला 13 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.
दिल्ली दंगलीसंदर्भात आणखी 50 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या दंगलीत शेकडो कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. तसेच काही जण प्राणास मुकले होते. खालीद दंगलीचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.