प्रतिनिधी / शिरोळ
प्रामाणिक कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान तसेच दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकरी यांची महाविकासघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी मिळावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांना आज देण्यात आले.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष रणजीतसिंह माने-पाटील यानी काँग्रेस पक्षाच्यावतीने हे निवेदन दिले. या विषयाचा लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार असलेचे सांगितले. या प्रसंगी शिरोळ तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक कोळेकर, मुसा डांगे, जयदीप थोरात, नितीन बागे, राजू नदाफ, व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.