तिरुअनंतपुरम शहरात कोरोनाबाधित गोपिकाने रुग्ण्वाहिकेत सोडविला पेपर
महामारीमुळे यंदा लोकसेवा आयोगासारख्या कारकीर्दीत विशेष महत्त्व असलेल्या परीक्षा अनेक विद्यार्थ्यांना देता आलेल्या नाहीत. यातील अनेक विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याने परीक्षेत सहभागी होऊ शकले नाहीत. तर अनेकांनी कोरोना संसर्गाच्या भीतीने परीक्षा केंद्रापर्यंत जाणे टाळले आहे.
अशा स्थितीतही केरळमध्ये तिरुअनंतपुरममधील गोपिका गोपन हिने पीएससी परीक्षा रुग्णवाहिकेत बसून दिली आहे. या परीक्षेद्वारे गोपिका सहाय्यक प्राध्यापिका होऊ इच्छिते. परीक्षेपूर्वी तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यावरही तिने हार मानली नाही आणि रुग्णवाहिकेत बसून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे लिहू लागल्यावर आपण परीक्षा केंद्रात बसलो आहोत का रुग्णवाहिकेत याचा कुठलाच फरक पडत नाही. त्यावेळी केवळ परीक्षेत चांगले गुण मिळविण्यावर लक्ष केंद्रीत असते, असे गोपिकाने म्हटले आहे.









