ऑनलाईन टीम / गोवा :
मॉडेल पूनम पांडे हिला गोवा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. गोव्यातल्या चापोली धरणावर तिने न्यूड फोटो शूट आणि व्हिडिओ तयार केले होते. या प्रकरणी गोवा फॉरवर्ड पार्टीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पूनम पांडेला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम पांडे ही सप्टेंबर महिन्यात गोव्यात गेली होती. तिथे तिने धरणावर फोटो शूट केले होते. या वादग्रस्त फोटो शूट प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रिकरण केल्याने मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडे हिच्याजवळ उभ्या असलेल्या दोन पोलीस कर्मचार्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.









