प्रतिनिधी/ सातारा
एका अनोळखीने त्याच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करत इस्ट्राग्राम या सोशल साईटवर एका मुलीसह एका महिलेचे फोटो त्यांच्या फोटोशेजारी अश्लिल फोटो टाकत बदनामी करण्यासाठी महिलेचा मोबाईल क्रमांक टाकल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इस्ट्राग्राम, फेसबुकवर महिलांची बदनामी करण्याचे प्रकार वाढले असून सर्वांनाच माध्यम वापराचे भान येण्याची गरज निर्माण झालीय.
याबाबत मुलीच्या पित्याने तक्रार दिली असून हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी घडलेला आहे. 7888119787 हा मोबाईल क्रमांक वापरणाऱया अनोळखी वापरकर्त्याने सोशल मिडिया इस्ट्राग्रामवर रॉकिंग गर्ल अनू या नावाने फेक अकौंट तयार केले. त्या अकौंटवर धंदेवाली, लव्हर कॉलमी अशा पोस्ट करत मोबाईल क्रमांक टाकला आहे.
या अश्लिल कॉमेंटबरोबरच या मोबाईल वापरकत्याने तिथे तक्रारदार यांच्या मुलीचे दोन फोटो टाकले व त्याच्या शेजारी अश्लिल छायाचित्रे प्रसारित केली. तसेच तक्रारदाराच्या वहिनीचा मोबाईल क्रमांक त्या फेक अकौंटवर टाकून त्यांची बदनामी केलेली आहे. याबाबत तक्रारीनंतर पोलिसांनी 7888119787 हा मोबाईल क्रमांक वापरणाऱयावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार कराळे करत आहेत.