- दिवसभरात 478 नवे कोरोना रुग्ण ; 12 मृत्यू
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 478 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 96 हजार 186 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 195 आणि काश्मीर मधील 283 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 968 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 578 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 88,718 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 36,165 रुग्ण जम्मूतील तर 52,553 जण काश्मीरमधील आहेत.
- आतापर्यंत 1502 जणांचा मृत्यू
तर आतापर्यंत 1502 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 503 जण तर काश्मीरमधील 999 जणांनी आपला जीव गमावला आहे.









