बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर सत्र न्यायालयाने सोमवारी माकपचे केरळ सचिव कोडियरी बाळकृष्णन यांचा मुलगा बिनीश कोडियरी याच्या कोठडीत पाच दिवसांची मुदतवाढ दिली. तो अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात आहे.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, कोडियरी यांची पाच दिवसांची नजरकैद संपल्यानंतर ईडीचे अधिकारी कोर्टात हजर झाले आणि बिनीशच्या कोठडीत मुदतवाढ देण्याची मागणी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिलंरल्या माहितीनुसार बिनीश आजारी असल्यामुळे त्याची चौकशी पूर्ण होऊ शकली नाही.
ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ (पीएमएलए) च्या कलम १९((१) अन्वये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या गुरुवारी बिनीशला अटक केली. दरम्यान केरळ सोन्याच्या तस्करी प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आणि बेंगळूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी यांच्यात संबंध असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. तसेच त्याने व्यवसाय करण्यासाठी ५० लाख दिल्याचे म्हंटले आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या चौकशीनंतर ईडी चौकशीला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये अनूप व इतर दोन जणांच्या अटकेसह कर्नाटकात अंमली पदार्थांच्या तस्करीचा भडका लावल्याचा दावा एनसीबीच्या चौकशीत करण्यात आला. बीनीशने त्याला अनूप आणि त्याच्या कुटुंबाची माहिती आहे आणि अनूपने काही वर्षांपूर्वी बेंगळूरमध्ये रेस्टॉरंट उघडण्यासाठी त्याच्याकडून आणि इतरांकडून पैसे घेतले.









