फ्रान्समध्ये कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेवर अंकुश मिळविण्यासाठी राष्ट्रव्यापी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या घोषणेनंतर पॅरिसच्या रस्त्यांवर आणि परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आवश्यक सामग्रीच्या खरेदीसाठी लोक मोठय़ा संख्येत घरातून बाहेर पडले आहेत. वाहनांची रांग सुमारे 7 किलोमीटर लांबीच होती. फ्रान्समध्ये 7 महिन्यात दुसऱयांदा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत लोकांना ये-जा करण्यास मज्जाव असणार आहे.
परंतु लोक आवश्यक काम, आरोग्य सेवा, आवश्यक कौटुंबिक गरजा किंवा घरानजीक व्यायामासाठी बाहेर जाऊ शकतात. दुसऱया टाळेबंदीत शाळा आणि बहुतांश उद्योग सुरू राहणार आहेत. तर सामान्य जनजीवनावर अनेक बंधने लादण्यासह बार, रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहे बंद राहणार आहेत.









