वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली (ता पन्हाळा ) येथील कोडोली – बोरपाडळे राज्य मार्गावर असलेल्या पोवार पानंद येथील शेड मधून सुमारे ३५ हजार किंमतीची जर्सी गायची रविवार दि. १ रोजी पहाटे चोरी झाली.
या चोरी बाबतची वर्दी अभिजीत पोवार यांनी कोडोली पोलिसात दिली आसून पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अभिजीत पोवार यांच्या दोन जर्सी गाई शेतातील शेडमध्ये बांधल्या होत्या. शनिवारी रात्री त्यांना चारापाणी करुन व दुध घेवून ते घरी आले होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास शेतात गेले असता, दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना दोनपैकी एक गाय शेडमध्ये नसल्याचे दिसून आले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु सापडली नाही. सदर गाय काळ्या पांढऱ्या रंगाची व शिंगे नसल्याच्या वर्णनाची आहे. कोडोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleउडतारेनजीक सेवा रस्ता गेला नदीत
Next Article जेऊर येथील एकाचा नावलीतील डोंगरात मृत्यू









