प्रतिनिधी / संगमेश्वर
बोलेरो पिकअप गाडीतून विनापरवाना आणि कत्तलीच्या हेतूने 7 गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री संगमेश्वर नाक्यावर ही कारवाई पोलिसांनी केली.
याबाबत पोलीस ठाण्यात बाबुराव कोंदल यांनी फिर्याद दिली आहे. ईद ए मिलाद मिलाद निमित्त संगमेश्वर नाक्यात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदी दरम्यान मुंबई गोवा हायवेवर चिपळूण च्या दिशेने बोलेरो पिकअप गाडी येताना दिसली. बॅटरीच्या प्रकाशात पोलिसांनी त्या गाडीला थांबण्याचा इशारा दिला. परंतु चालकाने उलट उत्तरे दिल्याने पोलिसांनी तपासणी केली असता गाडीमध्ये 7 गुरे दाटीवाटीने भरण्यात आलेली दिसली याबाबत त्यांच्याकडे कोणताही परवाना दिसला नाही.
चौकशी दरम्यान चालकाने आपले नाव महेश तानाजी सावंत रा.शाहूवाडी त्याच्या सोबत संदीप तुकाराम गुरव रा . आरवली संगमेश्वर आणि शरद वसंत कांबळे रा.आरोळ शाहूवाडी असे सांगितले आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली असून तिघांच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनावाखाली पोलीस करीत आहेत.
Previous Articleरशियात कोरोनाबाधितांनी ओलांडला 15 लाखांचा टप्पा
Next Article कर्नाटकात रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांहून अधिक









