प्रतिनिधी/ बेळगाव
वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन सिव्हिल हॉस्पिटल केवळ कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. आता बेळगाव जिल्हय़ात कोरोना महामारी नियंत्रणात येत आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल सामान्य रुग्णांसाठी कधी खुले होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
700 खाटांच्या या इस्पितळात गुरुवारी रात्री उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 70 कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित खाट शिल्लकच आहेत. त्यामुळे कोरोना महामारी नियंत्रणात असल्यामुळे इतर आजारांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू करावेत, अशी मागणी वाढली आहे.
सरकारी आदेशाच्या प्रतीक्षेत
गुरुवारी बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे साहजिकच उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला येणाऱया कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. इतर रुग्णांवर उपचार सुरू करण्यासाठी आपण सरकारी आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे लवकरच अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोना विषयक सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन इतर रुग्णांवर उपचार सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरि÷ अधिकाऱयांनी दिली. कारण गोर-गरिबांना खासगी उपचार परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून सिव्हिल हॉस्पिटल इतर रुग्णांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे.
सुरुवातीपासूनच बिम्समध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत. खासगी इस्पितळात उपचार सुरू होण्याआधी एका बिम्स्वर ताण पडला होता. त्यामुळे साहजिकच तेथील व्यवस्था कोलमडली होती. मध्यंतरी कोरोना बाधितांसाठीच्या विशेष वॉर्डमध्ये बाधितांनी जेवण व उपचारासाठी प्रशासनाला धारेवर धरले होते. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवून इस्पितळावर दगडफेक केल्याची घटनाही घडली होती.
त्यानंतरही बिम्स्मध्ये कोरोनाबाधितांवरील सेवा सुरू ठेवण्यात आली होती. रक्तदाब, मधुमेह, मानसिक आजार आदींवर महिन्याची औषधे घेणाऱया रुग्णांची सध्या सेवा बंद असल्यामुळे हाल सुरू आहेत. हजारो रुग्ण याच इस्पितळावर अवलंबून आहेत. कारण उपचाराबरोबरच औषधेही मोफत दिली जातात. आता कोरोना आटोक्मयात आल्यामुळे इतर रुग्णांवर उपचार सुरू करण्याची मागणी केली जात आहे. सरकारी आदेशानंतर जिल्हाधिकारी यासंबंधी निर्णय घेणार आहेत.









