वार्ताहर / कुंभोज
कुंभोज, हिंगणगाव, नेज परिसरातील अपंग बांधवांना प्रहार अपंग संघटनेच्या वतीने रविवारी कुंभोज येथील बिरदेव मंदिरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अपंगांना अंतोदय रेशन कार्ड ३५ किलो धान्य अन्न व पुरवठा विभाग कडून अंतोदय योजने मधे शासननियम नुसार समाविष्ट करून घेण्यासाठी व याचा लाभ मिळुन देण्यासाटी अंतोदय फॉर्म भरणेकामी मेळाव्याचे आयोजन तसेच प्रहार अपंग संघटनेच्या डिजिटल नामफलकाचे अनावरण सदर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी करण्यात येणार आहे .
या मेळाव्याला शिक्षण सभापती जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, प्रहार संघटनांचे चे जिल्हा अद्यक्ष देवदत्त माने, जिल्हा उपअध्यक्ष पश्चिम विभाग युनूस शेख,जिल्हा उपाअद्यक्ष तुकाराम पाटील, जिल्हा कार्यअद्यक्ष विकास चौगुले, इचलकरंजी शहर अद्यक्ष सुनील पाटील,शहर उपाध्यक्ष इरफान बागवान, कार्यअधक्ष अनिल विजयनगरे, कुंभोज सरपंच माधवी माळी, उपसरपंच जहांगीर हजरत उपस्तित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या मेळ्वामध्ये अंतोदय योजनेचे फॉर्म भरणे, सोबत विविध शासकिय योजना, युडीआयडी कार्डची माहिती व त्या संदर्भांत शंका निरसन करणात येणार आहे,यांचा सर्व अपंग बांधवानी लाभ घ्यावा अशी माहिती कुंभोज शहर प्रहार अपंग संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
या मेळाव्याला येताना दिव्यांग व्यक्तीने सीपीआर चा ४०% अपंग दाखला झेराक्स, कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेराक्स, रेशन कार्ड झेरॉक्स मास्क्स चा व सोशल डिस्टन्स चा वापर करा,सदरचा उपक्रम पूर्ण पणे मोफत आहे कोणते ही शुल्क आकारले जाणार नाही कार्यकमाचे ठिकाण व वेळ – बिरदेव मंदिर, हिंगणगाव रोड कुंभोज 1 रविवार सकाळी ठीक 10.30 वाजता अधिक माहिती साठी संपर्क :- कुंभोज शाखा अद्यक्ष सुरेश कोळी 9309814488 कुंभोज शाखा उपाअद्यक्ष शाहनवाज माकानदार 9921878430