प्रतिनिधी/ खेड:
मुंबई येथील गझल मंथन साहित्य संस्था व ब्रह्मकमल समूह यांच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गझलकार डॉ. विश्वास कुलकर्णी ( कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या मुशायऱ्यासाठी गझलकार माधुरी चव्हाणा – जोशी ( देवगड ), निर्मिती कोलते ( सांगली ), आनंद पेंढारकर ( डोबिवली ), एजाज शेख ( भुसावळ ), विशाल राजगुरू ( मुंबई ) आदी सहभागी होणार आहेत. मुशायऱ्याचे सूत्रसंचालन गझलकार नरेंद्र गिरीधर करणार आहेत. गझन मंथन साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष देवकुमार यांचे गझल मुशायऱ्यासाठी तांत्रिक सहाच्य लाभणार आहे.
अधिक माहितीसाठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे ९०५९२५५४५२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन गझला मंथन साहित्य संस्थेच्या सहसचिव उमा पाटील यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









