वार्ताहर/ खडकलाट
64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन येथील भारतीय बौध्द महासभा शाखेतर्फे रविवारी साजरा करण्यात आला. यानिमीत्त येथील डॉ. आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकरांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येथील भारतीय बौध्द महासभा शाखेचे अध्यक्ष व जागृती महाविद्यालय गडहिंग्लजचे प्रा. अनिल मसाळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हलकर्णीचे सेवानिवृत्त मुख्याद्यापक तिप्पाण्णा थरकार उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दसरा सणादिवशी बौध्द धम्माच्यादृष्टीने अनन्यसाधरण महत्त्व आहे. याचदिवशी सम्राट अशोक यांनी युध्दाचा तिरस्कार करुन शांती व अहिंसेचा संदेश देणाऱया बौद्ध धर्माचा स्विकार केला व बौध्द धम्माच्या प्रसारासाठी आपल्या पुत्रांना सर्व देशात पाठविले. यावेळी प्रा. अनिल मसाळे यांनी डॉ. आंबेडकर यांनी याचदिवशी बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्याचे सांगून युवकांनी डॉ. आंबेडकर व बुध्दांनी दिलेली धम्मचळवळ गतिमान करावी, असे आवाहन केले. स्वागत, सूत्रसंचलन व आभार डॉ. आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष व येथील भारतीय बौध्द महासभा उपाध्यक्ष सुकुमार थरकार यांनी केले.
या कार्यक्रमास हालशुगरचे माजी संचालक आर. बी. थरकार, उज्ज्वल थरकार, माजी सैनिक विक्रम थरकार, सचिन थरकार, मिथुन वराळे, पिरगोंडा थरकार, चिदानंद थरकार, अजित माळकरी, अशोक हळ्ळे, राकेश कांबळे, बाळू माळगे, अमर थरकार, विश्वास थरकार, महावीर थरकार, विशाल थरकार यांच्यासह येथील बौध्द समाजबांधव उपस्थित होते.









