प्रतिनिधी / मंडणगड
मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ तर उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली. पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात मंगळवारी ही निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली.
पंचायत समितीत चारपैकी 3 सदस्य शिवसेनेचे तर एक राष्ट्रवादीचा आहे. सभापती व उपसभापतीपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. यामुळे ही निवड बिनविरोध झाली. यामुळे पुढील शेवटच्या सव्वा वर्षासाठी देव्हारे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या स्नेहल सकपाळ सभापतीपदी तर प्रणाली चिले उपसभापतीपदी विराजमान झाल्या.यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, संदेश चिले, भगवान घाडगे, शशिकांत चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती सुनील मोरे, आदेश केणे, प्रणाली चिले, स्नेहल सकपाळ, अण्णा कदम, प्रेरणा घोसाळकर, सुरेश दळवी, रामदास रेवाळे, हरिश्चंद्र कोदेरे, दीपक मालुसरे, संजय शेडगे, राजेश भवणे, अमिता शिंदे, शहरप्रमुख विनोद जाधव, सिद्धेश देशपांडे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांनी शुभेच्छा दिल्या.