ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आता नियमित वर्ग सुरू केले जाणार आहेत, हा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेला.
या निर्णयानुसार आता 2 नोव्हेंबरपासून प्रदेशातील शाळांमध्ये 9 ते 12 वी चे वर्ग नियमितपणे सुरू केले जाणार आहेत. कॉलेजमध्ये देखील 2 नोव्हेंबरपासून शैक्षणिक सत्र सुरू केले जातील. यानुसार पहिल्या, दुसऱ्या आणि अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होणार आहेत.
यूजीसीच्या आदेशानुसार, हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रदेश सरकारने केंद्र सरकारच्या एसओपीचे पालन करत पालकांच्या सहमती पत्रावरून च शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अट कायम ठेवली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या एसओपीचा अवलंब करत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आणि थर्मल स्क्रीनिंग नंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.