तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सावकारी पाषाला कंटालुन पंढरपूर तालुक्यातील उंबरेपागे येथील एक शेतकरी इब्राहिम याकूब मुलाणी हे जिल्हाधिकारी कार्यालासमोरील टॉवरवर चढून आंदोलन करीत आहे.
दोन वर्षे झाले मला न्याय मिळत नाही. सावकार त्रास देत आहेत. मला न्याय द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार, बच्चू कडू यांना भेटूनही न्याय मिळाला नाही. मागील एक तास झाले आंदोलन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात डीडीआर कुंदन भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख प्रहार संघटनेची बैठक सुरू आहे.









