पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही, दुकानजागेची केली पाहणी
प्रतिनिधी / औंध
सर्वांगीण विकासासाठी रस्त्याचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर व्यापारपेठ देखील टिकली पाहिजे. व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रशासनाशी चर्चा करून तुमच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.
औंध येथील नवीन बसस्थानक परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणात अनेकांची दुकाने काढण्यात आली आहेत. दुकाने निघाल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. व्यापाऱ्यांनी गायत्रीदेवी यांना भेटून दुकाने पुन्हा उभी करण्यासाठी मार्ग काढण्यासाठी विनंती केली. यावेळी त्यांनी दुकानाच्या जागेची पाहणी करून. उपस्थितीत व्यापाऱ्यांना मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देऊन दिलासा दिला.
त्या म्हणाल्या, शासनाच्या मंजूर आराखड्याप्रमाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाशी समन्वयातून हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यात येईल. व्यापाऱ्यांनी देखील प्रशासनाला सहकार्य केले आहे दुकानदारांनी घाबरून जाऊ नये मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिन अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. दुकाने पूर्ववत सुरू करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
यावेळी सपोनि उत्तम भापकर, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, भरतबुवा यादव, आण्णा गोसावी, मुराद मुलाणी, शहाजी घोडके, दत्ता पवार, शाहीद शेख, शहाजी यादव, वैभव देशपांडे ग्रामस्थ उपस्थित होते.