ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरात उच्च न्यायालयाने सोमवारपासून सरन्यायाधीश विक्रमनाथ यांच्या न्यायालयातून थेट लाईव्ह प्रक्षेपणासह कामकाज करण्याची घोषणा केली आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील कामकाज यूट्यूबवर थेट प्रक्षेपित केले जात आहे. भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देत म्हटले होते की, जनतेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या न्यायालयांची सुनावणी पाहण्याची परवानगी देण्यात यावी.
या पत्रकात निरमा विद्यापीठाचा स्कूल ऑफ लॉ चा विद्यार्थी पृथ्वीराजसिंह कोला याने दाखल केलेल्या जनहित याचिकेचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यात न्यायालयाने न्यायालयीन कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले.