प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी पार्क,रुईकर कॉलनी,कदमवाडी रोड परिसरात शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यानी रस्त्यावर उभ्या असलेल्या कार्सच्या काचा फोडून आतील किंमती साहित्य लंपास केले.शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमिष भवानभाई पटेल (वय 45 रा.शिवाजी पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एम.एच-09 बी.एक्स 1783 या इनोव्हा कारमधील एक लाख रुपये किंमतीचा इनबील्ट टचस्क्रीन,एच.एच-09 डी.एक्स.-2730 या क्रमांकाच्या मारुती सुझुकी सियाज कारमधील 10 हजार रुपये किंमतीचा कारटेप,एम.एच-09,एफ.जे.0598 मारुती सुझुकी वॅगनार या कारमधील 10 हजार रुपये किंमतीचा कारटेप,एम.एच-09,डी.एम.5801 या इनोव्हा कारमधील 1 लाख रुपये किंमतीचा इनबील्ट टचस्क्रीन,एम.एच.09-बी.झेड,0369 मारुती सुझुकी आर्टिगा कारमधील 15 हजार रुपये किंमतीचा कारटेप,एम.एच.09,डी.ए-4972 मारुती सुझुकी वॅगनार या कारमधील 10 हजार रुपये किंमतीच कारटेप असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी चोरुन नेला. शिवाजी पार्क,रुईकर कॉलनी,शिवराज कॉलनी,कदमवाडी रोड,निंबाळकर कॉलनी या परिसरातील कारच्या काचा फोडून आतील सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.शाहूपुरी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड तपास करत आहेत.
सी.सी.टी.व्ही च्या आधारे तपास-
शिवाजी पार्क,रुईकर कॉलनी परिसरात अनेक ठिकाणी सी.सी.टी कॅमेरे आहेत.यामुळे सी.सी.टी.द्वारे चोरटÎापर्यंत पोहोचता येते.त्यामुळे पोलीसांनी परिसरातील सी.सी.टी.व्ही चे चित्रीकरण ताब्यात घेण्यास सुरु केले आहे.
Previous Articleघरी राहुन दसऱ्याचा आनंद लुटा : छ. शाहू महाराज
Next Article खऱ्या-खोट्यात अडकला थकीत`एलबीटी’!









