प्रतिनिधी / नागठाणे
बोरगाव पोलिसांनी शनिवारी पहाटे एका खाजगी ट्रॅव्हल्सवर छापा टाकत कोट्यवधी रुपये किमतीची चांदी पकडली. दागिन्यांच्या स्वरूपात असलेल्या या चांदीमुळे शनिवार दिवसभर त्याचे मोजमाप करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला न्हवता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशियाई महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधून अवैधरित्या चांदीची वहातुक होत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे महामार्गावर नागठाणे चौकात पोलिसांनी सदर खाजगी आरामबस थांबवून झडती घेतली.
यावेळी बसमध्ये काही भरलेली पोती असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी बस पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या पोत्यांची संख्या २० ते २५ च्या आसपास असून ती चांदीच्या विविध प्रकारच्या दागिन्यांनी खचाखच भरलेली असल्याचेही समजते. यांचे वजन काहीशे किलोच्या वजनात असून किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचेही समजते.
शनिवारी दिवसभर सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतलेल्या चांदीचे मूल्यांकन व मोजमाप करण्याचे काम सुरू होते. याच्या मुल्यमापणासाठी पोलीस लॉकअपचा परिसर पोलिसांनी मोठा प्लास्टिक कागद लावून पॅक केला होता. येथेच दिवसभर मूल्यांकणाचे काम सुरू होते. या प्रकरणी काही लोकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. याबाबत अधिक तपास सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला न्हवता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









