प्रतिनिधी / सांगली
दसऱ्याच्या मुहूर्तावर नविन वाहनांची मोठया प्रमाणात खरेदी होत असते. दसऱ्याच्या दिवशी अशा नविन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा, तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा, याकरिता राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये / उप प्रादेशिक परिवहन कार्यालये रविवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सूरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ विलास कांबळे यांनी दिली आहे.
सांगलीत ही २५ रोजी वाहन नोंदणीचे व त्या अनुषंगिक कर वसूलीचे कामकाज सूरू ठेवले जाणार आहे. सदर कामासाठी आवश्यक असणारा संबंधीत अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून वाहन नोंदणी व कर वसूलीचे कामकाज करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








