ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देव यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याने त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
फोर्टिस रुग्णालयाने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, माजी क्रिकेटपटू कपिल देव (वय 62) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मध्यरात्री 1 वाजता ओखला रोड येथील फोर्टिस एस्कॉर्ट्स हर्ट्झ इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.
देव यांची तपासणी केल्यानंतर कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. अतुल माथूर यांनी देव यांची इमर्जन्सी कोरोनरी अँजिओप्लास्टी केली. अँजिओप्लास्टी ही ब्लॉक केलेल्या धमन्या उघडण्याची प्रक्रिया आहे जेणेकरून हृदयात सामान्य रक्ताभिसरण होऊ शकते.