प्रतिनिधी/खेड
विजयादशमीनिमित्त कोकण रेल्वेमार्गावर बुधवारपासून साप्ताहिक फेस्टीवल स्पेशल गाड्या धावत असून प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे. यामुळे 24 ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक फेस्टीवल स्पेशल रेल्वेगाडीही धावणार आहे.
कोरोनाचा पादुर्भाव कमी होऊ लागल्याने रेल्वे पशासनाने फेस्टीवल स्पेशल रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वास्को-द-गामा ते पटना ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल बुधवारपासून धावू लागली आहे. या पाठोपाठ शुकवारपासून नागपूर-मडगाव, पुणे-मडगाव साप्ताहिक फेस्टीवल स्पेशल गाड्या धावणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करूनच पवास करण्याची मुभा पवाशांना देण्यात आली आहे.
जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक स्पेशल गाडी 24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. जबलपूर येथून दर शनिवारी सकाळी 11 वा. सुटून तिसऱया दिवशी सायंकाळी 4.40 वा. कोईमतूरला पोहोचेल. परतीच्या पवासात कोईमतूर येथून सोमवारी सायंकाळी 3.30 वा. सुटून तिसऱया दिवशी सकाळी 8 वाजता जबलपूरला पोहोचेल. बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी 7 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी धावेल. जबलपूर येथून सकाळी 11 वा. सुटून तिसऱया दिवशी मध्यरात्री 2.50 वा. कोईमतूरला पोहोचेल. परतीच्या पवासात दर सोमवारी सायंकाळी 6 वा. कोईमतूर येथून सुटून तिसऱया दिवशी सकाळी 8 वा. जबलपूरला पोहोचेल. कोकण मार्गावर या गाडीला पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आदी मार्गावर थांबे देण्यात आले आहेत.
Previous Articleबिहारमध्ये भाजप देणार मोफत कोरोना लस
Next Article सुशीलकुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह









