प्रतिनिधी/ बेळगाव
बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी टिळकवाडी येथील एल. ई. एसप्रेसो हॉटेलच्या सभागृहात कोवीडच्या नियमांचे काटेकोर पालन करून चीनी महामारीत जोखीम घेऊन काम करणाऱया खालील नागरीकांचा रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनतर्पे शाल-प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
चंद्रकांत हरपनहळ्ळी, वेंकटेश पाटील, महेश लाड, चिराग भातकांडे या चारही नागरिकांनी विशेषत: लॉकडाऊनच्या काळात भिकाऱयांना, जनावरांना, व इतर गरीब नागरिकांना, परराज्यातील मजुरांना पाण्याच्या बाटल्या, भोजन, आदीची स्वखर्चातून व्यवस्था केली. शिवाय कोवीडने मृत्यू पावलेल्यांचा अंत्यसंस्कार पण केला.
रोटरीचे अध्यक्ष अशोक कोळी, सेपेटरी नागेश मोरे व इतर पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. रोटरीच्या वतीने किशोर काकडे यांनी कन्याकुमारीतील शिला स्मारकाची पुस्तके देत शिला स्मारकाला जरूर भेट द्या असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी रोटे, सतीश नाईक व अन्य सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले.









