प्रतिनिधी / शाहुवाडी
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भात शेतीची पाहणी करण्यासाठी भाजपचे जिल्हा ग्रामिण अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे पोहोचले शेतावर प्रत्यक्ष शेतात जाऊन घेतली नुकसानीची माहिती शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी
भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी शाहुवाडी पन्हाळा तालुक्याचा दौरा करून नुकसानग्रस्त भात शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाहूवाडी तालुक्यातील कोपर्ड तालुका शाहूवाडी येथील गणेश गायकवाड यांच्या भात शेतीला भेट देऊन त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी केली 68 गुंठ्यात केलेले भात पीक पूर्णता जमीनदोस्त झाली असून मिळणारे उत्पादन ही पूर्णता घटले असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अधिकाधिक भरपाई मिळावी अशी अपेक्षा भात उत्पादक यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान कृषी अधिकारी ए सी धेडे यांनी एकूण नुकसानीची माहिती समरजितसिंह घाटगे यांना दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष शामराव कारंडे नगराध्यक्ष अमोल केसरकर उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर भाजपचे तालुकाध्यक्ष विजय रेडेकर अजित्सिंह काटकर आदींच्या भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या तर कोपर्डे ग्रामस्थांच्यावतीने शामराव कारंडे यांनी समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









