बेळगाव तालुक्मयातील 24 जण : रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा
बेळगाव : सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत चालली असून कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढली आहे. बुधवारी बेळगाव जिल्हय़ात 70 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे. यामध्ये बेळगाव ग्रामीण 5 तर शहर व उपनगरांतील 19 असे बेळगाव तालुक्मयात एकूण 24 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
कोरोनाबाबतची भीती आता कमी झाली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या पाहून अनेक जण भयभीत झाले होते. मात्र आता हळुहळू ही संख्या कमी होत असून अनेकांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव जिल्हय़ात एका दिवसांत 400 ते 500 रुग्ण आढळत होते. आता मात्र ही संख्या 100 च्या आत आली आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून हा आकडा कमीकमी होत चालला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला असून सर्वसामान्य जनतेच्या मनातील भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.









