वार्ताहर / उचगाव
श्रद्धा आणि स्वच्छ मन महत्त्वाचे आहे. श्रद्धेने आणि एकीने केलेले कोणतेही काम तडीस जाते. श्रद्धा आणि एकीमुळेच गेली 69 वर्षे हा पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू असल्याचे मत ता. पं. सदस्या मथुरा तेरसे यांनी व्यक्त केले.
उचगाव गोजगे रस्त्यावरील परमहंस गुप्तानंद महाराजांची 69 वा पुण्यतिथी कार्यक्रमाच्या सांगता समारंभातील महाप्रसाद वितरण शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. समारंभाला श्रीकृष्ण राईस मिलचे मालक बाळकृष्ण तेरसे, ग्रा. पं. माजी सदस्य सुनील देसाई, अरुण जाधव, मधुकर जाधव, दूध संघ व व्यापारी अनिल देसाई, प्रकाश बन, रमेश चौगुले, शंकर गिरी, विलास मण्णूरकर, परशराम कोवाडकर, नागेंद्र तरळे, राजू तरळे, बसवंत कोवाडकर, दिलीप तरळे, शरद जाधव, ओंकार गिरी, रघु लाळगे, संतोष पाटील, लक्ष्मण लाळगे, सुरेश मण्णूरकर, अन्नपूर्णा जाधव, थोरली जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
बसुर्ते गावातील मठामधून गुप्तानंद महाराजांचा ध्वज उचगाव येथील मठात आल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर दोन दिवस विविध धार्मिक व पूजा कार्यक्रम पार पडले. परमहंस गुप्तानंद महाराजांच्या समाधीस्थळी पूजा, आरती, अभिषेक असे कार्यक्रम झाले.
महाप्रसादाचा खर्च मथुरा तेरसे यांच्याकडून
या कार्यक्रमाचा सागंता समारंभ महाप्रसादाने करण्यात आला. या महाप्रसादाचा संपूर्ण खर्च ता. पं. सदस्या मथुरा तेरसे व बाळकृष्ण तेरसे यांच्यावतीने करण्यात आला. त्यांच्याच हस्ते पूजन करून या महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील तसेच बसुर्ते गावातील अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा
लाभ घेतला.









