नवी दिल्ली : देशभरामध्ये दसरा दिवाळीची तयारी सुरू असून जोडीला कोरोनाबाबतची काळजीही घेतली जात आहे. भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या सरकारच्या आवाहनाला भारतातील व्यापाऱयांकडून प्रतिसाद दिला जात आहे. यातूनच यंदा मातीच्या पणत्या व इतर उत्पादनांच्या मागणीत तीनपट वाढ दिसणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मातीच्या पणत्यांसह विविध उत्पादनांना येणाऱया काळात मागणी वाढलेली दिसेल. याचा भारतातील कुंभार व्यावसायिकांना निश्चितच फायदा होणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळीकरता लागणाऱया मातीच्या पणत्यांसह विविध आकाराच्या दिव्यांना मागणी वाढेल असे सांगितले जात आहे. तेव्हा या व्यवसायाला चांगले दिवस असतील, असे सांगितले जात आहे.









