जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 28 वाढलेः ग्रामीण भागात 163 वाढलेः2379 रूग्ण उपचारात
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नवीन 191 रूग्ण वाढले आहेत. तर 244 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात 43 हजार 427 रूग्ण बाधित झाले आहेत. तर त्यातील 39 हजार 451 रूग्ण बरे झाले असून दोन हजार 379 रूग्ण उपचारात आहेत. तर आज अखेर एक हजार 597 रूग्णांचा बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात पुन्हा रूग्ण वाढू लागले
महापालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून 20 पेक्षा कमी रूग्ण आढळून येत होते. पण बुधवारी पुन्हा रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात बुधवारी 28 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 21 तर मिरज शहरात सात रूग्ण वाढले आहेत. आजअखेर मनपा क्षेत्रात 15 हजार 819 रूग्ण झाले आहेत. त्यातील 91 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
ग्रामीण भागात 163 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्ण वाढीचा वेग आता कमी होवू लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व दहा तालुक्यात ही रूग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला चांगला दिलासा मिळत चालला आहे. बुधवारी ग्रामीण भागात 163 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 19, जत तालुक्यात पाच, कडेगाव तालुक्यात 23 तर कवठेमहांकाळ तालुक्यात चार रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 13, मिरज तालुक्यात दहा आणि पलूस तालुक्यात दहा रूग्ण वाढले आहेत. शिराळ तालुक्यात 12 तर तासगाव तालुक्यात 41 रूग्ण तसेच वाळवा तालुक्यात 26 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू
बुधवारी उपचार सुरू असताना जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यातील एक, खानापूर तालुक्यातील एक आणि तासगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील एकाचा तर कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात एकाचा आणि वाळवा तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे आजअखेर जिल्हÎात कोरोनाने एक हजार 597 रूग्णांचा बळी गेला आहे.
244 रूग्ण बरे झाले
बुधवारी जिल्ह्यात 244 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्ह्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या 39 हजार 451 इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी दिवसेदिवस वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील 90 टक्केपेक्षा अधिक रूग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचारात दोन हजार 379 रूग्ण आहेत.
नवीन रूग्ण 191
उपचारात 2379
बरे झालेले 39451
एकूण 43427
मृत्यू 1597








