वार्ताहर / खोची
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडे सादर करावेत. पंचनामे करताना ग्रामस्थांना सोबत घ्या. बाधित झालेल्या सर्व क्षेत्राचा पंचनामा झाला पाहिजे. कामात कसलीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना आमदार राजू आवळे यांनी खोची येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना दिल्या. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळवून दिली जाईल, अशी माहिती आमदार आवळे यांनी यावेळी दिली.
अतिवृष्टी, ढगफुटी, वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील खोची, भेंडवडे, सावर्डे गावांतील शेतीची पाहणी आमदार राजूबाबा आवळे यांनी सोमवारी दुपारी केली. यावेळी ते बोलत होते.त्यांच्यासोबत कृषी,महसूल,ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.खोची -भेंडवडे रस्त्यावरील दोन्ही गावच्या भात,सोयाबीन आदि प्रचंड नुकसान झालेल्या शेतीच्या ठिकाणी आमदार आवळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची महिती घेतली.
तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे म्हणाले,’जिरायत,बागायत व फळपीक यांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. येत्या दहा दिवसांत तालुक्यातील सर्व पंचनामे पूर्ण केले जातील.
Previous Articleसांगली : मनपा क्षेत्रात फक्त नऊ रूग्ण वाढले
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू









