प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील एरंडोली येथे मिरज-सलगरे या राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खुदाई करतेवेळी पाण्याची मुख्य पाईप लाईन फोडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे गावात साचलेल्या ओढ्यातील पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असून,ठेकेदाराने पाईप लाईन बदलावी, अन्यथा राज्य मार्ग रस्त्याचे काम बंद पडू, असा इशारा देण्यात आला आहे.








