दोन मजली बंगल्यासह ६ जमिनी, आंबा कलमांची बाग, लोटेतील प्लॉटचा समावेश, १० नोव्हेंबरला होणार व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे लिलाव, साऱ्यांच्या नजरा रोखल्या
प्रतिनिधी – खेड
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबके येथील सहा मालमत्तांचा तस्करी व विदेशी विनिमय हाताळणी कायद्यातंर्गत १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मुंबके येथील दोन मजली बंगल्यासह ६ जमिनी, आंबा कलमांची बाग व लाटेतील एका फ्लॉटचाही समावेश आहे. ही लिलाव प्रक्रिया व्हिडिओ कॉन्स्फरन्सद्वारे होणार असून याकडे साऱ्यांच्या नजरा रोखल्या आहेत.
गुन्हेगारी जगतात अधिराज्य गाजवणारा दाऊद इब्राहिम मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर खऱ्या अर्थाने चर्चेत आला. त्याचे मूळगाव मुंबके असले तरी त्याचे कुटुंबीय मुंबईतच वास्तव्यास होते. मुंबईत रहात असताना तो आई-वडिलांसोबत मुंबके येथे येत होता. यादरम्यान, एक-दोन दिवसाच्या वास्तव्यानंतर लगेचच मुंबईला परतायचा. मुंबईनंतर त्याचे कुटुंबीय परदेशात स्थायिक झाले.
दाऊदचे मूळगाव मुंबके असले तरी १९८६ नंतर तो मूळगावी फिरकलाच नसल्याचे सांगण्यात येत आहे. १९७८ मध्ये त्याने मुंबके येथे दोन मजली बंगला बांधला. मात्र, बहिणीच्या अकाली निधनाने बंगल्याकडे दुर्लक्षच होवून बंगल्याचे काम देखील अर्धवटच राहिले. १९८६ च्या दरम्यान, तो विवाहबद्ध झाल्यानंतर तो देश सोडून गेल्याचे सांगण्यात येते. १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हा बंगला शासनाच्या ताब्यात गेल्यापासून ओसच पडला होता. वर्षभरापूर्वीच त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या सर्व मालमत्तांचे अॅन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मुल्यांकनही झाले होते.
मुंबके येथील दाऊद व त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या दोन मजली बंगल्यासह एक एकर जागेत २५ ते ३० झाडांची आंबा कलमांची बाग देखील आहे. तसेच महामार्गावर लोटे औद्योगिक वसाहतीनजीक पेट्रोलपंपासाठी खरेदी केलेल्या एका प्लॉटचा देखील समावेश आहे. या साऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वत्त येथे धडकताच साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ही लिलाव प्रक्रिया नेमकी कशी पार पडते याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









