मृत्यृदर घटतोय, 8 जणांचा मृत्यू, सातारा, कोरेगाव तालुक्यात वाढ
कराड तालुक्यात वेग मंदावला, जावली 29, फलटण 18 बाधित
नॉन कोविड रुग्णांवर उपचार करा
प्रतिनिधी / सातारा
ऑगस्टच्या मध्यपासून सप्टेंबरच्या पूर्ण महिन्यात जिल्हय़ात कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. मात्र ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचा वेग मंदावल्याने दिलासा मिळत असला तरी अद्यापही सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात बाधित आढळून येत असल्याने भितीचा पगडा कायम आहे. यामध्ये अफवांचे प्रमाण अधिक आहे. होम आयसोलेशनमुळे कोरोना केअर सेंटर ओस पडलीत. आजमितीस एकूण बाधितांची संख्या 43,511 एवढी झाली असली तरी जिल्हय़ात 36,397 कोरोनामुक्त झालेले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात काल शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 278 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
सातारा, कोरेगावात वाढ सुरुच
कोरोनाचा वेग मंदावू लागला असला तरी थांबलेला नाही. सातारा तालुका व शहरात कमी संख्येने पण रुग्ण वाढ सुरुच आहे. तर कराडमध्ये वेग मंदावत असल्याचा दिलासा मिळू लागलाय. मात्र कोरेगाव तालुक्यात शनिवारच्या अहवालात 51 बाधित समोर आलेत. त्यानंतर मग जावली 29, फलटण 18, खटाव 15, पाटण 14 असे बाधितांचे आकडे आहेत. वाई, खंडाळा, महाबळेश्वर, माण एक अंकी संख्येवर आलेत. मात्र जिल्हय़ात एक बाधित रुग्ण आढळणार नाही तो खरा सुदिन असून सर्वजण त्याची वाट पहात आहेत.
नॉन कोविड रुग्णांना दिलासा द्या
लॉकडाऊनमध्ये विशेष कोणीही आजारी पडत नव्हते. त्यानंतर अनलॉक सुरु झाला अन तपासण्यांचा वेग वाढवण्यात आला. शासकीय व खासगी स्तरावर टेस्टिंग सुरु झाले. यामध्ये अँटीजन टेस्टमध्ये बाधित वाढण्याचे प्रमाण जास्त होते. त्या टेस्टची खात्री 70 टक्केच होती. मात्र तरीही टेस्टिंगमुळे बाधितांची संख्या वाढू लागली. यामध्ये काहींना लक्षणे नाहीत पण ते बाधित असल्याचे सांगून त्यांच्यासाठी होम आयसोलेशनचा उपाय दिला. आता वेग मंदावलाय तरीही भीतीचा पगडा कायम आहे. त्यातून समाजाला बाहेर काढण्याची गरज आहे. ज्यांना इतर व्याधी आहेत त्यांना त्या व्याधीवर प्रथम उपचार मिळत नाही. आला की प्रथम कोरोना टेस्ट कंपलसरी करण्यात आल्याने अनेकजण दवाखान्यात जाण्याचे टाळू लागलेत हे धोकादायक असून प्रशासनाने यावर मार्ग काढून ठोस दिलासा देण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
शनिवारी रात्रीच्या बाधित अहवालामध्ये :
सातारा तालुका 69 बाधित
सातारा 11, सदाशिवपेठ 3, बुधवार पेठ 2, मंगळवारपेठ 3, रविवारपेठ 1, गुरुवारपेठ 4, गोडोली 5, कृष्णानगर 1, विद्यानगर 1, कोडोली 1, न्यू एमआयडीसी 1, समर्थमंदिर 5, मल्हारपेठ 1, राधिका रोड 1, शाहुपुरी 1, पंताचा गोट 1, करंजे 2, तामजाईनगर 3, विलासपूर 1, वारणानगर 1, नागठाणे 2, जैतापूर 1, आरफळ 3, चिंचणेरवंदन 1, कळंबे 1, शिवथर 1, लिंब 1, कामाठीपुरा 6, कारंडवाडी 2, बोरखळ 1, मांडवे 1.
कोरेगाव तालुका 51 बाधित
कोरेगाव 4, खेड 10, भक्तवडी 4, रहिमतपूर 14, नागझरे 1, वाघजाईवाडी 3, एकंबे 2, कुमठे 1, वाठार किरोली 2, आझादपूर 1, अपशिंगे 1, भोर 1, खटापूर 1, रेवडी 1, रेवडी 3, जळगाव 1, नायगाव 1.
कराड तालुका 36 बाधित
कराड 1, मसूर 5, भोसलेवाडी किरोली 1, मलकापूर 2, कोयनावसाहत 1, अभ्याचीवाडी 3, ओंडशी 2, पोतले 1, वडगाव हवेली 2, रेठरे खु 1, शेणोली स्टेशन 1, कार्वेनाका 1, शिंदे मळा मलकापूर 1, टेंभू 1, हजारमाची 1, आटके 2, बनवडी 3, मलकापूर 1, आगाशिवनगर 2, केसेगाव 1, घारेवाडी 1, केसे पाडळी 1, मालखेड 1.
जावली तालुका 29 बाधित
मेढा 1, म्हाते खु 7, गांजे 6, मोरावळे 1, केळघर तर्फ सोळशी 1, सरताळे 2, इंदावली 1, कुडाळ 1, भोगावली 4, गावडी 3, कुसुंबी 1, मालचौंडी 1.
फलटण तालुका 18 बाधित
ताथवडा 1, पद्मावतीनगर 1, लक्ष्मीनगर 1, पाडेगाव 1, साठे 1, मठाचीवाडी 1, वडगाव 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, काळज 2, तरडगाव 5, कोळकी 1.
खटाव तालुका 15 बाधित
खटाव 3, मायणी 4, पुसेसावळी 2, नडवळ 1, भुरकेवाडी 1, ललगुण 2, सिध्देश्वर कुरोली 1, वडूज 1.
पाटण तालुका 14 बाधित
पाटण 2, माजगाव 2, चाफळ 2, ढेबेवाडी 1, घाणबी 3, मन्याचीवाडी 1, अंबावणे 1, मेंढोशी 1, साबळेवाडी 1.
वाई तालुका 6 बाधित
गंगापुरी 3, मेणवली 1, व्याजवाडी 1, पसरणी 1.
खंडाळा तालुका 6 बाधित
लोणंद 3, हरताली 2, भादवडे 1.
महाबळेश्वर तालुका 3 बाधित
स्कॉलरस फाऊंडेशन पाचगणी 3.
माण तालुका 5 बाधित
बिदाल 2, म्हसवड 2, इंजबाव 1.
इतर : गवडी 3, नागेवाडी 1, पारगाव 1, तांबेनगर 1, रामपूर 1, डुबलवाडी 1, कालेगाव 1. बाहेरील जिल्हा– मुरुम (बारामती)
जिल्हय़ात 8 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे ता. सातारा 69 वर्षीय पुरुष तसेच जिह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी ता. माण 46 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा 63 वर्षीय पुरुष, कराड 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 75 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गुरुवार पेठ ता. सातारा 72 वर्षीय पुरुष, कराड 70 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर वाढे ता. सातारा 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,71,511
एकूण बाधित 43,511
एकूण कोरोनामुक्त 36,397
मृत्यू 1,430
उपचारार्थ रुग्ण 5,684